मू. जे. महाविद्यालयाने पटकावले प्रतिभा संगमचे सर्वसाधारणपद विजेतेपद

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पुणे येथे आयोजी १९ व्या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन प्रतिभा संगममध्ये मूळजी जेठा महाविद्यालयास राज्यस्तरीय सर्वसाधारण विजेते पद पटकविले आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साहित्य प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये साहित्य लेखनाचे आणि सादरीकरणाचे कौशल्य विकसित व्हावे म्हणून राष्ट्रीय कला मंच आयोजित प्रतिभासंगममध्ये मू. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकूण सहा कलाप्रकारात साहित्य प्रकारांमध्ये भाग घेतला. त्यातील कथाकथनमध्ये तृतीय संगीता सुनील चंचल, एसवायबीए रोख रुपये एक हजार १११ व स्मृतिचिन्ह ), ललित लेखामध्ये प्रथम मानसी शर्मा, टीवायबीए रोख रुपये तीन हजार ३३३ व स्मृतिचिन्ह आणि पथनाट्य कला प्रकारांमध्ये द्वितीय विषय जळगाव जिल्ह्यातील अज्ञात स्वातंत्र्य योद्धे। सहभागी कलाकार दुष्यंत तिवारी, चंदन भामरे, चंचल संगीता सुनील धांडे, ओम थोरात, मानसी शर्मा, दिनेश नारखेडे, गायत्री माळी, पूर्वा वारुडकर. तुषार महाजन, सोनल शिरतुरे रोख रुपये दोन हजार २२२ व स्मृतिचिन्ह) पारितोषिक प्राप्त करून सर्वसाधारण विजेतेपद (रोख रुपये एक हजार एक शे आकारा व स्मृतिचिन्ह ) पटकावले.विशेष म्हणजे महाविद्यालयाने आतापर्यंत ठाणे, परभणी, नाशिक, पुणे, आणि लातूर येथील प्रतिभा संगम सर्व साधारण विजेतेपद पटकावले होते आता दोन वर्षाच्या कालावधीनंतर पुणे येथील पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दि.१७ व १८ मेला झालेल्या एकोणिसाव्या प्रतिभा संगम मध्ये पुन्हा मू.जे. महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावून सर्वसाधारण विजेतेपदाची परंपरा कायम राखली आहे.

Protected Content