पारोळा येथील शिक्षक संघटनातर्फे कोवीड रूग्णांसाठी १ लाख १६ हजारांची मदत

पारोळा प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्ती काळात लोकसहभागातून मदतीच्या आवाहनाला पारोळा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे १ लाख १६ हजाराची मदत देण्यात आली. तहसीलदार गवांदे यांच्याकडे धनादेश सुपूर्त करण्यात आला.

कॉटेज हॉस्पिटलसाठी प्रशासनाच्यावतीने कोरोना बाधित रुग्णांना लोकसहभागातुन मदतीसाठी केलेल्या आवाहन केले होते. त्यानुसार ऑक्सिजन कॉन्सन्स्ट्रेटर व जनरेटर घेण्यासाठी मदत निधी जमा करावा या दृष्टिकोनातून पारोळा तालुक्यातील माध्यमिक,उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी १ लाख १६ हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आला आहे. जमा झालेल्या निधीतून कॉटेज हॉस्पिटलसाठी लाईट गेल्यानंतर ॲडमिट रुग्णांसाठी ऑक्सिजन नियमित सुरू राहावे याकरिता इलेक्ट्रिक जनरेटरची आवश्यकता असल्याने जनरेटर बसवण्यात येणार आहे. निधीचा धनादेश तहसीलदार गवांदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे, डॉ. मयुर पाटील यांच्यांकडे गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, विस्ताराधिकारी सी.एम. चौधरी, नगरसेवक पी.जी. पाटील यांच्या उपस्थित सुपूर्त करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार गवांदे साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, तालुक्यातील शिक्षक बांधवांनी या काळात प्रशासनाने जी काही जबाबदारी सोपोवली, ती प्रामाणिकपणे पार पाडून प्रशासनाला नियमित सहकार्य केले आहे. फक्त विद्यार्थ्यांना शिकवणे या कामापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जाणीव ठेवून सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असल्याबद्दल तालुक्यातील शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी कविता सुर्वे, डॉ.शांताराम पाटील, नगरसेवक पी.जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद माने, पी.के. सोनजे, विजय बडगुजर, कमलेश देवरे, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष आर. पी. पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोरख पाटील, कला शिक्षक संघाचे अध्यक्ष एस.जी. झडप, क्रीडा युवा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष संदीप पवार, अनिल वाघ, विश्वास वाघ, डी.बी.पाटील, नितीन मराठे, एस.आर. पाटील, सी. एम. पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार टीडीएफचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले.

Protected Content