गोदावरी कृषी संकुल परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील कृषी संकुल परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संकुल परिसराचे संचालक डॉ. एस. एम. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ. अशोक चौधरी, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुनमचंद सपकाळे, अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. एस. ढोले, प्रा. एन. डी. पाटील, क्रीडा अधिकारी प्रा. आर. डी. चौधरी, तीनही महाविद्यालयांचे परीक्षा विभाग प्रमुख, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी/विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

कार्यक्रमात संचालक डॉ. एस. एम. पाटील, संशोधन संचालक डॉ. अशोक चौधरी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुनमचंद सपकाळे यांनी मनोगतपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. ललित जावळे, डॉ. मिलिंद तायडे, श्री मनोज अत्तदे, श्री देवेंद्र भंगाळे, कुंदन धनगर, पंकज सपकाळे, भूषण इंगळे, वर्षा पाटील, सारिका पाटील, अर्चना फालके, साउंड सिस्टीमचे सचिन पाटील आणि अजय कोळी यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. डी. चौधरी आणि प्रा. करण बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. दर्शना जाधव यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, उपप्राचार्य प्रा. प्रवीण देवरे आणि परीक्षा विभाग प्रमुख प्रा. शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमातून प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वाच्या संदेशावर भर देण्यात आला. सर्व उपस्थितांनी राष्ट्रप्रेम आणि एकात्मतेच्या भावनेने हा दिवस साजरा केला.

Protected Content