जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेला ऑनलाईन पध्दतीने वेगवेगळ्या पध्दतीचे दोन वर्षात आठ पटीने रक्कम देण्याचे आमिष दाखवत तब्बल ७ लाख १० लाख ५२८ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात सुवर्णा संभाजी पवार (४५) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १ जुलै २०२० मध्ये सुवर्णा पवार या महिलेला सुरत येथील केवीन ब्रम्ह भंटट, जिग्ना, जनकभाई (पूर्ण नाव समजू शकले नाही) या तीन जणांनी संपर्क साधत त्यांना एका योजनेत आयडी तयार करुन त्यात पैसे भरण्यास सांगितले. जेवढी रक्कम भरली त्याच्या आठ पट रक्कम दोन वर्षात दिली जाईल, असेही त्या महिलेला सांगण्यात आले. त्यानुसार या महिलेने १ जुलै २०२० ते ३१ जुलै २०२० या दरम्यान वेगवेगळ्या आयडीवर रक्कम भरली. बोली केलेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी अर्थात तीन वर्षे झाली तरी या महिलेला भरलेल्या रकमेच्या आठ पट रक्कम मिळाली तर नाहीच उलट मुद्दल सात लाख १० हजार ५२८ रुपयेदेखील हातचे गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर महिलेने सोमवारी १८ सप्टेंबर रेाजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलिस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केवीन ब्रम्ह भंटट, जिग्ना, जनकभाई असे नावे सांगण्याऱ्या तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.