गृहमंत्री अनिल देशमुख यांचा रविवारी जिल्हा दौरा

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख हे रविवार १ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून अमळनेर येथील कार्यक्रमास उपस्थिती देणार आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

गृहमंत्री देशमुख यांचा दौरा याप्रमाणे राहणार आहे.
* रविवार 1 नोव्हेंबर, 2020 रोजी दुपारी 13.30 वाजता शहादा येथून हेलीकॉप्टरने अमळनेरकडे प्रयाण.
* दुपारी 14.15 वा. अमळनेर हॅलीपॅड येथे आगमन व आमदार अनिल पाटील यांचे निवासस्थानाकडे प्रयाण व राखीव.
* दुपारी 15.00 ते 15.45 वाजेपर्यंत अमळनेर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व सन्मानीय लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
* दुपारी 15.50 वा. अमळनेर नगरपरीषद येथील जिजाऊ महिला व्यायाम शाळा व सवित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन
तद्नंतर अमळनेर हेलीपॅडकडे प्रयाण.
* दुपारी 16.15 वा. हेलीकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

Protected Content