बांधकाम ठेकेदाराच्या खून प्रकरणी दोघांना अटक; गुन्ह्याची कबुली

67cfe0e2 d310 44fd bd57 674a733a934a

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी बु ॥ येथील बांधकाम ठेकेदार बिपीन मोरे यांच्यावर धारदार शास्त्राने वार करून खून केल्याची घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आले होते. खून करून पसार झालेले दोघांना एमआयडीसी पोलीसांनी किनोदा ता. तळोदा येथून अटक केली.

याबाबत माहिती अशी की, बिपिन दिनकर मोरे वय 40 रा. खेडी बुद्रुक ता.जळगाव हे आज सकाळी 9 वाजेच्या दुचाकी पेट्रोल भरण्यासाठी आणि कचोरी घेण्यासाठी घराबाहेर बाहेर पडले. त्यावेळी आगोदर दबा ठेवून असलेले आरोपी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे (मराठे) रा. खेडी बु ॥ आणि शुभम उर्फ कोयता शेखर पाटील रा. भुसावळ यांनी बिपीन यांच्यावर हल्ला चढवत धारदार शस्त्राने खून केला. त्यानंतर ते पांढऱ्या रंगाच्या दुचाकीने फरार झाले. घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसात परीसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आणि गोपनिय माहितीनुसार धुळ्याकडे गेले असल्याची माहिती मिळताच पथक रवाना झाले. फागणे येथे थोडक्यात दोघांची आणि पोलीसांची चुकाचुक झाली. त्यानंतर पुन्हा माहितीनुसार सदरील आरोपी हे नवापूर येथे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने धुळे ते नवापूर असा पाठलाग करत असतांना किनोदा ता. तळोदा जि. नंदुरबार या गावाजवळ मोटारसायकल दिसून आली. त्यानंतर आरोपी अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे (मराठे) रा. खेडी बु ॥ आणि शुभम उर्फ कोयता शेखर पाटील रा. भुसावळ या दोघांना अटक केली.

अटक केल्यानंतर बिपीन मोरे यांचा खून आपणच केला असल्याची कबुली दिली आहे. सदरील घटना घडल्यानंतर एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाट यांनी पोउनि संदीप पाटील, स.फौ. अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, पो.ना.मनोज सुरवाडे, विजय पाटील, पोकॉ किशेार पाटील, गोविंदा पाटील आणि सचिन पाटील यांचे पथक तयार करून आरोपींच्या शोधार्थ रवाना केले होते.

Protected Content