भुसावळातील कारागृहात कैद्यासाठी मोफत योग शिबीर

bhusawal news 3

भुसावळ प्रतिनिधी । जळगाव येथील मु.जे.महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी या विभागांतर्गत एम.ए. द्वितीय वर्षीय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मनोज रावत आणि शिला शर्मा यांनी भुसावळ दुय्यम कारागृहातील कैद्यासाठी सात दिवसीय योग शिबीर घेण्यात आले.

आयोजित केलेल्या शिबीराचे उद्घाटन कारागृह अधिक्षक सचिन पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. शनिवार 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत हे शिबीर राहणार असून यात कैद्यांना सकाळी 7.15 ते 8.15 दरम्यान प्राणायाम, ध्यान, योग परीचय, प्रात्यक्षिके आणि जागरूकता याबाबत मार्गदर्शन मनोजकुमार रावत आणि शिला शर्मा यांनी केले. यावेळी 45 कैद्यांना प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन केले.

Protected Content