यावलमध्ये ६५५ कोरोना बाधीत; ५४१ रूग्णांची संसर्गावर मात

यावल प्रतिनिधी । तालुक्यात आज १० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यामुळे आजवरची रूग्णसंख्या ही ६५५ झाली असून यातील ५४१ रूग्णांनी या विषाणूवर मात केली आहे.

यावल तालुक्यातील रूग्ण संख्या वाढली असली तरी बरे होणार्‍यांचे प्रमाण देखील वाढले आहे. तालुक्यातील भालोद प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत एकुण ७२ कोरोना बाधीत रूग्ण मिळाले आहेत. यात भालोद२०, अट्रावल१२, चितोडा७, सांगवी बु॥१८ चिखली बु॥१३, डोंगर कठोरा५ चिखली खु॥१ अशी रूग्णसंख्या असुन यातील २८ रुग्ण हे कोवीड सेन्टर मध्ये उपचार घेत आहेत तर ४८ रुग्ण उपचारांतर घरी पाठविण्यात आले आहे. तर चितोडा१ आणी भालोद येथे १ जणांचा मृत्यु झाला आहे.

पाडळसा प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत एकुण ५५ रुग्ण मिळाले असुन यात पाडळसा १५, म्हैसवाडी १९, अंजाळे ६,दुसखेडा २, तर बामणोद येथे १३ रूग्ण आढळुन आले आहेत. यातील ३४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाले असुन १९ रुग्ण उपचार घेत असुन म्हैसवाडी १ आणी पाडळसा १ अशा दोन रुग्णांचा मृत्यु झाला आहे. हिंगोणा प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत एकुण ६८रुग्ण कोरोना बाधीत मिळाले असुन , यात हिंगोणा१३, न्हावी ३३, आमोदा १५, पिंपरुड ६ तर हंबर्डी १ असे रुग्ण मिळुन आले आहेत. तर यातील ५६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाले आहे तर केवळ ६ रुग्ण उपचारार्थ दाखल असुन ,न्हावी येथील ३, हिंगोणा येथील २, आमोदा २ जणांचा यात मृत्यु झाला आहे.

सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत एकुण ६५ रुग्ण कोरोना बाधीत असुन यात कोरपावली गावातील ६, दहीगाव१७, सातोद३, कोळवद२०,परसाडे२,महेलखेडी ७, सावखेडा सिम५,मोहराळा५ अशी रूग्ण असुन यातुन ३० रुग्णहे उपचारार्थ दाखल आहेत. तर ३५ रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. या केन्द्रा अंतर्गत कोरपावली येथे १ दहीगाव२व महेलखेडी १ अशा ४ जणांचा मृत्यु झाला आहे. साकळी प्राथमिक आरोग्य केन्द्राने रुग्णाबाबत उच्चांक गाठले असुन या ठिकाणी १३१ रुग्ण कोरोना बाधीत असुन यात साकळी ८६ चुंचाळे १६बोराळे२ बोरावल खु॥२मनवेल५ निमगाव १ विरावली ३ शिरसाड १५टाकरखेडा १ असे रुग्ण असुन यातील १६ रुग्ण हे डिस्चार्ज झाले आहे तर साकळी गावातील ४ बाधीतांचा मृत्यु झाला आहे.

किनगाव प्राथमीक आरोग्य केन्द्रा अंतर्गत ९५ रुग्ण मिळाले आहेत. यात किनगाव४१; डांभुर्णी १९; नायगाव१, चिंचोली १२, दोनगाव१३, आडगाव१२ रुग्ण आहेत. यातील ४९ रुग्ण हे डिस्चार्ज झाले आहेत. तर ५१ रुग्ण उपचार घेत आहे तर किनगाव ३, डांभुर्णी २, दहीगाव१ असे रुग्णांचा मृत्यु झाले आहे.

Protected Content