भुसावळातील माजी लोकप्रतिनिधीला कोरोनाची बाधा

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील एका मातब्बर माजी लोकप्रतिनिधीला कोरोनाची बाधा झाली असून ते उपचारासाठी मुंबई येथे रवाना झाले आहेत.

भुसावळ शहरासह तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. मध्यंतरी रूग्ण संख्या आटोक्यात आली असली तरी आता पुन्हा रूग्ण आढळून येत आहेत. या अनुषंगाने रविवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणार्‍या एका बड्या माजी लोकप्रतिनिधीला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रिपोर्ट आल्यानंतर तातडीने उपचारासाठी रविवारी रात्री मुंबईला रवाना झाले आहेत.

दरम्यान, संबंधीत लोकप्रतिनिधी हे शिवसेनेशी संबंधीत असल्याने ते पॉझिटीव्ह झाल्याची माहिती समोर येताच पक्षाचे पदाधिकारी व त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांची दूरध्वनीवरून विचारपूस केली.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!