खाकीतले कोरोना योध्दे म्हणताय…’ही वेळ घाबरण्याची नव्हे तर लढण्याची !’

रावेर शालीक महाजन । कोरोनाविरूध्दच्या लढाईत पोलिसांचे योगदान मोठे आहे. अर्थात, पन्नाशी पार केलेल्या कर्मचार्‍यांना संसर्गाचा धोका असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन शासनाने केले आहे. तथापि, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे हे दोन अधिकारी हे पन्नाशीच्या पार असूनही अव्याहतपणे थेट मैदानावर उतरून कोरोनाचा प्रतिकार करतांना दिसून येत आहेत.

पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करतांना दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे. या पार्श्‍वभूमिवर, रावेर पोलिस स्टेशनचे निरिक्षक रामदास वाकोडे व फैजपुरचे डिवायएसपी नरेंद्र पिंगळे या अधिकार्‍यांची गेल्या काही महिन्यांमधील धडपण तालुकावासी अनुभवत आहेत. दोघेही अनुभवाच्या जोरावर गुन्हेगारी आणि कोरोना दोन्ही विरुध्द एकहाती खिंड लढवताय
स्वयंघोषित कोरोना योध्दे तर अनेक ऐकले आहे बघितले आहे. गेल्या जवळपास साडेचार महिन्यांपासून कोरोना व गुन्हेगारी दोघां विरुध्द एकहाती खिंड लढवत प्रसिध्दिच्या वलया पासुन खुप लांब राहिलेले दोघे कोरोना योध्दे आहेत.

पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे हे दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून व्यायाम योगासन करतात. ते कोरोना काळात संवेदनशिल रावेरसह इतर गावे सुध्दा सांभाळताय. रात्री -बे-रात्री पेट्रोलिंग करतात एवढेच नव्हे तर अनेकदा थेट कोविड सेंटरला जाऊन बंदोबस्तची माहिती घेतात. अनेकदा रात्री अचानक शेरी नाका (पाल), चोरवड चेक पोस्टला भेटी देतात. आपला दांडगा अनुभवाच्या जोरावर साहाय्यक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक,पोलिस उपनिरिक्षक सुनिल कदम,मनोज वाघमारे, व पोलिस कर्मचार्‍यांच्या सहकार्याने रावेर पोलिस स्टेशनच्या कायदा-सुव्यवस्थेचा गाढा हाकत आहेत. या संदर्भात संवाद साधरला असतात निरिक्षक रामदास वाकोडे म्हणतात की, गुन्हेगार सुटता कामा नये आणि कोरोना येता कामा नये.

दरम्यान, याचप्रमाणे फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांचे वय पन्नाशीच्या पलीकडचे असले तरी ते अतिशय सक्रीयपणे दोन्ही आघाड्यांवर लढत आहेत. रावेरात घडलेली दंगल आटोक्यात आणण्यासाठी श्री पिंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले आहे. तर कोरोनाच्या आपत्तीमध्ये त्यांच्यातील एक अतिशय कर्तव्यदक्ष व तत्पर अधिकारी दिसून आला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे दोन्ही अधिकार्‍यांमध्ये कमालीचा समन्वय आहे. दोघे आपले सहकारी अधिकारी व पोलिस तसेच नागरीकांना कोरोना विरुध्द लढण्याचे प्रोत्साहन देतात. कोरोना विरूध्दची लढाई जिंकण्यासाठी खाकी आपल्या सोबत असल्याचा आधार ते जनतेला अव्याहतपणे देत आहेत.

कोरोनाशी प्रतिकार करतांना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमिवर, सरकारने पन्नासच्या वर वय असणार्‍यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. असे असतांनाही डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांची कर्तव्यदक्षता, तत्परता आणि जिद्द ही वाखाणण्यासारखी आहे. अनेक जण स्वत:च स्वत:ला कोविड योध्दे म्हणवून घेतात. काही संस्थांकडून पारितोषीक मिळवून ते मिरवूनही घेतात. तथापि, पिंगळे व वाकोडे यांच्या सारखे अधिकारी हेच खरे कोविड योध्दे असल्याचे समाजाने लक्षात घेतले पाहिजे.

Protected Content