ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका लस वृद्धांवर परिणामकारक

लंडन: वृत्तसंस्था । ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनका विकसित करत असलेली लस वृद्धांवर परिणामकारक ठरत असल्याचे चाचणीत समोर आले आहे. कोरोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे समोर आले आहे..

आतापर्यंत चाचणी सुरू असलेल्या काही लशी या वृद्धांसाठी परिणामकारक ठरल्या नाहीत. या लशींमुळे विषाणूंविरोधात अॅण्टीबॉडी तयार होत नसल्याचे समोर आले आहे. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस अॅण्टीबॉडीज आणि टी-सेलची निर्मिती करत असल्याचे आढळून आले आहे. ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाकडून मात्र, याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आली नाही.

ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लशीशिवाय अमेरिकेतील मॉडर्ना इंकने विकसित केलेली लस वृद्धांवर परिणामकारक ठरत असल्याचे चाचणीत समोर आले होते. मॉडर्ना विकसित करत असलेल्या लशीची चाचणी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे. ही लस देण्यात येत आलेल्या व्यक्तींना कोणतेही गंभीर साइड इफेक्टस जाणवले नाहीत. मात्र, काही थंडी वाजणे, थकवा जाणवणे, यासारख्या तक्रारी काहींनी केल्या आहेत.

वयस्कर, वृद्ध व्यक्तींना लशीचा फायदा झाला पाहिजे याकडे लस विकसित करणाऱ्या कंपनीचा कटाक्ष आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस चाचणी सुरू होणार आहे. अमेरिकेत लस चाचणी सुरू करण्याबाबत नियामक मंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे. ब्रिटनमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी सुरू असताना एका स्वयंसेवकाची प्रकृती खालावली होती. त्यानंतर ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाने लस चाचणी थांबवली होती.

Protected Content