लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यात २ लाख ३० हजार गुन्हे दाखल – गृहमंत्री

 

मुंबई प्रतिनिधी । लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ३० हजार ९३६ गुन्हे दाखल झाले आहेत अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ३० हजार ९३६ गुन्हे दाखल झाले आहेत. ३३ हजार ५५३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच विविध गुन्ह्यांसाठी २१ कोटी ३६ लाख ९ हजार ४५४ रु. दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १८ ऑगस्ट या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ६३ हजार २६७ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३३४ (८८८ व्यक्ती ताब्यात) १०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १० हजार ६०२ राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८२९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७
जप्त केलेली वाहने – ९५, ८९९

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस –(मुंबईतील ५५ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५९,नवी मुंबई २, ठाणे शहर १५, पुणे शहर ३,नागपूर शहर २,नाशिक शहर १,अमरावती शहर १,औरंगाबाद शहर ३, सोलापूर शहर ३, ठाणे ग्रामीण ३ व १ अधिकारी,पालघर २ व १ अधिकारी, रायगड २,पुणे ग्रामीण १,सांगली १,सातारा २,सोलापूर ग्रामीण १, नाशिक ग्रामीण ४, जळगाव २,अहमदनगर २,उस्मानाबाद १,बीड १,जालना १,बुलढाणा १,मुंबई रेल्वे ४,पुणे रेल्वे अधिकारी१,औरंगाबाद रेल्वे १,एसआरपीएफ Gr 3 जालना-१,एसआरपीएफ Gr 9 -१, एसआरपीएफ Gr 11 नवी मुंबई १, एसआरपीएफ Gr 4 -१अधिकारी,ए.टी.एस. १,पीटीएस मरोळ अधिकारी १,एसआयडी मुंबई २) सध्या ३०४ पोलीस अधिकारी व १९६२ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

Protected Content