किनगावात अल्पवयीन मुलीने घेतला गळफास

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव गावात एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून यावल पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गावातील ही चौथी घटना आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, आज दि.२८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास किनगाव तालुका यावल येथील राहणारी त्रिशिला अडकमोल (वय१४, इत्तया ९वी) शिकणारी किनगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद अडकमोल यांची अल्पवयीन मुलगी हिने आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या अल्पवयीन मुलीची आई बाहेरगावी गेली असल्याने ती तिच्या वडीला सोबत घरी होती. वडील जेवण करून बाहेर गेल्यावर त्रिशिला अडकमोल हि घरात एकटीच होती. तेव्हा बऱ्याच वेळेने बाहेर दिसली नाही हे पाहुन शेजारी राहणाऱ्या तिला आवाज दिला मात्र तिने प्रतिसाद न दिल्याने घराचा दरवाजा आतुन बंद केला असल्याने ग्रामस्थांनी भिंतीवरून घरात उडी घेतली. त्यावेळेस त्रिशिला ही घरातील छतास गळफास घेवुन मृत अवस्थेत आढळुन आली.

दरम्यान या संदर्भात यावल पोलीसात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उप निरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे .किनगाव गावात मागील पंद्रा दिवसातील आत्महत्या करण्याची ही चौथी घटना असून, आत्महत्या करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने परिसरात हा विषय चर्चचा बनला आहे . मात्र या अल्पवयीन मुलीने आत्महत्या सारखे पावुल का उचलले आहे या प्रश्नाचे उत्तर मिळु शकले नाही .

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!