दुदैवी घटना : रंग धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा खदानीत पडल्याने बुडून मृत्यू ! नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील लोहार गल्लीत राहणारा १७ वर्षीय मुलगा हा त्यांच्या तीन मित्रांसोबत धुलीवंदन खेळल्यानंतर रंग धुण्यासाठी जांभोरा शिवारातील खदानीत पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी २५ मार्च रोजी दुपारी १ वाजता घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर काशिनाथ महाजन वय-१७ रा. लोहार गल्ली, धरणगाव असे मयत मुलाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील लोहार गल्लीत ज्ञानेश्वर महाजन हा मुलगा आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. सोमवारी २५ मार्च रोजी दुपारी ज्ञानेश्वर महाजन हा मुलगा त्यांच्या तीन मित्रांसोबत जांभोरे शिवारातील शेतात धुलीवंदन निमित्ताने रंग खेळले. त्यानंतर दुपारी १ वाजता रंग खेळल्यानंतर ज्ञानेश्वर महाजन हा खदानीत रंग धुत असतांना त्यांचा अचानक पाय घसरला. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ज्ञानेश्वर महाजन हा पाण्यात पडल्याचे त्यांच्या मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. काही पोहणाऱ्या तरूणानी ज्ञानेश्वर याला बाहेर काढले. त्याला धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी मयत घोषीत करताच नातेवाईकांनी मन हेलविणारा आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील हे करीत आहे.

Protected Content