यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारावर सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक असलेला विमल गुटखा व पान मसालाची चोरटी वाहतूक होत असल्याचे माहितीच्या आधारावर केलेल्या कारवाईत वाहनासह सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून या गुन्ह्यात तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, साकळ येथील यावल-किनगाव रस्त्यावरील नावेर गावाजवळील भोनक नदीच्या पुलावर १९ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास यावल पोलीसांनी गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारावर रिक्शा क्रमांक एम एच १९ सि डब्ल्यु ३५४९ या वाहनाची झाडाझळ घेतली असता सदरच्या वाहनात साकळी येथील शेख रफिक शेख मुनाफ यांच्या किराणा दुकानासाठी यावल येथील प्रमोद जगन्नाथ बुरूजवाले ही व्यक्ती न्यायालयाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक असलेला सुमारे ५० हजार रूपये किमतीचा केसर युक्त विमल गुटखा आणि ९० हजार रुपये किंमतीची रिक्शातुन चोरटी वाहतुक करतांना आढळुन आला आहे. यावलचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान व पोहेकॉ सिकंदर तडवी यांनी केलेल्या कारवाई मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत साकळी दुरक्षेत्र पोलीस चौकीस नेमणुकीत असलेले पोलीस कॉस्टेबल अल्लाऊद्दीन मुबारक तडवी यांनी फिर्याद दिल्याने यावल पोलीस ठाण्यात प्रमोद जगन्नाथ बुरूजवाले, शेख रफीक शेख मुनाफ, संदीप उर्फ बापु सोपान धनगर यांच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयीत आरोपी प्रमोद जगन्नाथ बुरुजवाले, शेख रफीक शेख मुनाफ व संदीप सोपान धनगर या तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या तीन संशयीतांना न्यायालयाने २२ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे .