मतदानादरम्यान गडचिरोली जिल्ह्यात भू-सुरुंगाचा स्फोट

59319181 india maharashtra gadchiroli 0312

नागपूर (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणूक प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कसनसून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघेझरी मतदान केंद्राजवळ आज सकाळी ११.३० च्या सुमारास नक्षलवाद्यांनी भू-सुरुंग स्फोट घडवून आणला. सुदैवानं यात कोणतेही नुकसान झाले नाही.
गडचिरोलीत आज कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले. मतदान सुरू असतानाच वाघेझरी मतदान केंद्राजवळ स्फोट झाला. यामुळं मतदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली. स्फोटानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. काल गट्टा गावात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात दोन जवान जखमी झाले होते.

छत्तीसगड मध्येही आयईडीचा स्फोट
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये एका मतदान केंद्राजवळ आज पहाटे आयईडीचा स्फोट घडवून आणला. स्फोटानंतर बस्तरमध्ये हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. आयटीपीबीचे जवान मतदानासाठी केंद्रावर जात असतानाच हा स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मतदान केंद्रांवर जाणारे आयटीबीपीचे जवान हे नक्षलवाद्यांचे मुख्य लक्ष्य होते, अशी माहिती समजते. निवडणुकीत अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न नक्षलवाद्यांकडून केले जात आहेत.

Add Comment

Protected Content