धरणगाव श्री बालाजी मंदिराचा शनिवारी जिर्णोध्दार

dharangaon 1

धरणगाव (प्रतिनिधी )। येथील श्री बालाजी मंदिराची स्थापना २२५ वर्षा पूर्वी करण्यात आली. वेदशास्त्र संपन्न स्व. दामोदर बाळकृष्ण पुराणिक यांनी श्री बालाजी भगवानाची स्थापना केले. पुढे वाणी समाजातील दानशुर व्यक्ती कै.वेडू नारोबा वाणी यांनी पदरचे पैसे खर्च करून या मंदिराचा जिर्णोध्दार केला. स्व.दामोदर पंतांना विश्वनाथ, माधवराव, गोविंदराव व पुरुषोत्तम हे ४ मुले त्यापैकी माधवराव व विश्वनाथबुवा पुढे या मंदिराची देखभाल व पुजाअर्चा करू लागले. यानंतर मंदिराचा जिर्णोध्दार चैत्र शु.।। श्रीराम नवमी म्हणजे शनिवार १३ एप्रिल रोजी दुपारी ४:३० वा करण्यात येणार आहे.
गावातील समाजधुरीणांनी स्वातंत्र्य पुर्व काळात गावातून नवरात्र महोत्सव वाहनोत्सव सुरू केला. रथोत्सवाच्या दिवशी असलेला उत्साह, चैतन्य निर्माण करणारा असतो. १९५३ साली श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळ म्हणून धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली. भाविकांची श्रध्दा व मंदिराची दुरावस्था पाहून श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाने श्री बालाजी मंदीराचे विश्वस्थ श्री पुराणिक बंधूंशी जिर्णोध्दारासंबंधी चर्चा सुरू केली. १२ वर्षाच्या प्रयत्नांनंतर या मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी एकमत होउन श्री बालाजी संस्थानचे कालिदास माधवराव पुराणिक, लिलाधर गोविंद पुराणिक, रमाकांत पद्माकर पुराणिक, रत्नाकर पुरुषोत्तम पुराणिक व प्रभाकर पुरुषोत्तम पुराणिक व श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे पदाधिकारी यांच्यात जिर्णोध्दारासाठी सांमजस्य करार करण्यात आला आहे. त्यानूसार मंदिराची मालकी व पुजेचा अधिकार वारसाहक्काप्रमाणे श्री पुराणिक बंधूंचा अबाधित ठेऊन श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळ समाजाच्या सहकार्याने जिर्णोध्दार करणार आहे. आगामी २ वर्षात जिर्णोध्दाराचे काम पुर्ण करण्याचा मानस आहे. मंदिराचा प्लॅन धुळे येथील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट श्री रवि बेलपाठक हे तयार करताहेत.
मंदिराचा जिर्णोध्दार चैत्र शु.।। श्रीराम नवमी म्हणजे शनिवार १३ एप्रिल रोजी दुपारी ४:३० वा. संपन्न होणार आहे. कान्हदेशाचे पंढरपुर अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज संस्थानचे मठाधिपती प.पू. प्रसाद महाराज, श्री नारायण भक्ति पंथाचे मुख्य प्रवर्तक प.पू. ब्रह्मस्वरूप संतश्री लोकेशानंदजी महाराज, रामेश्वर येथील प.पू.नारायण स्वामी व धरणगाव येथील महामंडलेश्वर ह.भ.प. श्री भगवान बाबा यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्धित रहावे असे आवाहन श्री पुराणिक बंधू व श्री बालाजी वहन व्यवस्थाबपक मंडळाचे अध्यक्ष दिलीप रामू पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव वाघ, सेक्रेटरी राजेंद्र पवार, प्रशांत वाणी, अशोक येवले व सर्व सदस्यांनी केले आहे. सांमजस्य करार परिपूर्ण होणेसाठी स्टॅम्प वेंडर दत्तात्रय आधार चौधरी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मंडळाने त्यांचे आभार मानले आहे.

Add Comment

Protected Content