Home क्राईम मयुर कॉलनीतून तरूणाची दुचाकी लांबविली

मयुर कॉलनीतून तरूणाची दुचाकी लांबविली

0
64


जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मयुर कॉलनीतून एका तरूणाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी १९ मे रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल मोरसिंग चव्हाण वय ३२ रा. मयूर कॉलनी, जळगाव हा तरूण कुटुंबासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी १८ मे रोजी रात्री १० वाजता त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीवाय ५७९९) ही रात्री घरासमोर पार्कींगला लावली होती. मध्यरात्री दुचाकी ही दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे रविवारी १९ मे रोजी सकाळी ६ वाजता समजले. त्यानुसार त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. याप्रकरणी सोमवारी २० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहे.


Protected Content

Play sound