मुरूम टाकण्याच्या कारणावरून कुटुंबातील ५ जणांना बेदम मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री गावात मुरूम टाकण्याच्या कारणावरून कुटुंबातील ५ जणांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील पिंप्री गावात निकीता किरण कापसे वय २० या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी अंगणात मुरूम टाकण्याच्या कारणावरून शनीवार ९ मार्च रोजी रात्री ८ वाजता महिलेसह तिचे सासरे चंद्रसिंग गोविंदा कापसे, दिर अक्षय चंद्रसिंग कापसे, सासू आणि त्यांची जाऊ यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी निकीत कापसे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे संजय गोविंदा कापसे, रघूनाथ गोविंदा कापसे, प्रविण मगन कापसे, रूपोश संजय कापसे, आकाश मगन कापसे, जगदीश छगन कापसे, मगन गोविंद कापसे आणि छगन गोविंद कापसे सर्व रा. पिंप्री ता. चाळीसगाव यांच्या विरोधात रविवारी १० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रविण संगेले हे करीत आहे. .

Protected Content