अमळनेर मतदारसंघातील ग्रामिण भागातील कामांसाठी ४८ कोटींचा निधी !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी मतदारसंघातील ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी तब्बल ४८ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

अमळनेर ग्रामीणसाठी ४८ कोटींचा निधी पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून  सुमारे १९ कामे होणार आहेत.या रस्त्यांमुळे व नवीन पुलामुळे ग्रामीण भागाच्या दळणवळणास गती मिळणार असून अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क वाढणार आहे.

याठिकाणी होणार कामे,

पिंगळवाडे निंभोरा चिखली नदीवर पुलाचे बांधकाम करणे. प्रजिमा ३ कि.मी. ४२/२५०,रक्कम रु ३९६.३६ कोटी,एरंडोल कल्याणे खु. जळोद मठगव्हाण रस्ता प्रजिमा ५२ कि.मी. ३६/२०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे(भाग, धावडे ते सावखेडा ),रक्कम रु ४९.६५ लक्ष,पिंगळवाडे ते गांधली (इजिमा ८२ ) रस्त्याचे बांधकाम करणे,रक्कम रु ६० लक्ष,रा.मा. ३९ ते जांभोरा ढेकू हेडावे शिरसाळे वावडे रस्ता प्रजिमा ५१ कि.मी. २०/९०० ते २२/१५० ची सुधारणा करणे (अमळनेर शहरातील लांबी),रक्कम रु ३ कोटी,रा.मा. ३९ ते जांभोरा ढेकू हेडावे शिरसाळे वावडे रस्ता प्रजिमा ५१ कि.मी. ३७/५०० ते ३९/५०० ची सुधारणा करणे (भाग वावडे गावातील),रक्कम रु २ कोटी,मांडळ जवखेडा आर्डी अनोरे पिंपळे मंगरुळ शिरुड कावपिंप्री रस्ता प्रजिमा १२९ कि.मी. १४/०० ते १७/०० ची सुधारणा करणे (भाग- पिंपळे ते मंगरुळ),रक्कम रु ३ कोटी,अमळनेर ते पिंपळे रस्ता कि.मी. ०/५०० ते ३/०० ची सुधारणा करणे,रक्कम रु ३ कोटी,पिंपळे ते चिमणपुरी रस्ता सा.क्र. ०/१०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे.रक्कम रु २ कोटी,डांगरी लोणसिम लोणचारम,लोण बु., लोण खु.,वावडे,आर्डी,खडके, निसर्डी, लोंढवे,शिरुड, फाफोरे बु., कन्हेरे, सडावण, रढावण, राजोरे, सारबेटे बु. रस्ता प्रजिमा १२७ कि.मी. ३३/०० ते ३७/०० ची सुधारणा करणे. (भाग कन्हेरे ते सडावण)रक्कम रु ३ कोटी,एरंडोल कल्याणे खु. जळोद मठगव्हाण रस्ता प्रजिमा ५२ कि.मी. ९२/०० ते ९६/०० ची सुधारणा करणे (भाग- ब्राम्हणे ते मुडी )रक्कम रु २ कोटी ५० लक्ष,एरंडोल कल्याणे खु. जळोद मठगव्हाण रस्ता प्रजिमा ५२ कि.मी. ७५/५०० ते ८६/०० मध्ये भौमितीक सुधारणा करणे. (भाग- निम ते भिलाली),रक्कम रु १ कोटी,

डांगरी, लोणसिम, लोणचारम, लोण बु., लोण खु.,वावडे, आर्डी, खडके निसर्डी, लोंढवे, शिरुड, फाफोरे बु.,कन्हेरे, सडावण, रढावण, राजोरे,सारबेटे बु. रस्ता प्रजिमा १२७ कि.मी. ३७/१०० ते ३९/०० ची सुधारणा करणे. (भाग सडावण ते रढावण),रक्कम रु ३ कोटी,डांगरी, लोणसिम, लोणचारम,लोण बु., लोण खु., वावडे,आर्डी, खडके, निसर्डी, लोंढवे,शिरुड, फाफोरे बु., कन्हेरे, सडावण, रढावण, राजोरे सारबेटे बु. रस्ता प्रजिमा १२७ कि.मी. ३९/०० ते ४३/०० ची सुधारणा करणे. (भाग – सडावण ते रढावण)रक्कम रु ३ कोटी,जळोद ते पातोंडा ग्रा.मा. २८ कि.मी. ०/० ते ८/०० ची सुधारणा करणे,रक्कम रु ४ कोटी ५० लक्ष,नंदगाव ते मेहेरगांव रस्ता ग्रा.मा. ५६ कि.मी. ०/० ते ८/०० ची सुधारणा करणे,रक्कम रु ३ कोटी,इजिमा ८२ ते रा.मा. १५ लगत ग्रा.मा. ४९ चे कि.मी. ०/० ते २/०० ची बांधकाम करणे. रक्कम रु १ कोटी ५० लक्ष,मागासवगीय मुलींचे शासकीय वसतीगृह इमारत बांधकाम करणे,रक्कम रु ३ कोटी, वावडे, जानवे, बहादरपूर, पारोळा, कासोदा रोड प्रजीमा-४६ कि.मी. २५/०० ते २९/०० मध्ये मजबुतीकरणासह सुधारणा करणे.(भाग- बहादरपूर ते इंधवे),रक्कम रु २ कोटी ५० लक्ष,भोलाणे, बहादरपूर, भिलाली, रत्नापिंपरी, शेळावे रस्ता प्रजीमा -४८ कि.मी. १५ /०० ते २०/५०० मध्ये मजबुतीकरणासह सुधारणा करणे.(भाग- भिलाली ते रा.मा. ०१ पर्यंत),रक्कम रु ३ कोटी.

दरम्यान,  राज्य शासनाने हा निधी मंजूर केल्याने मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना अजित पवार,ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन व पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Protected Content