धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर येथे ‘लेवा गणबोली दिन’ साजरा

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेवा गणबोली दिन’ साजरा करण्यात आला.

त्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मराठी साहित्याचे प्रसिद्ध साहित्यकार प्रा. व.पु.होले यांनी सांगितले की लेवा बोली ही खानदेश ची वेगळी ओळख करून देणारी भाषा आहे. त्यातून अनेक सांस्कृतिक विचार आणि संस्कार मिळतात. देशाला न्हवे तर जगाला संस्कार देण्याची क्षमता लेवा बोलीत आहे. म्हणून जागतिक स्तरावर लेवा बोलीतील साहित्य पोहचविले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. अश्या अनेक उदाहरनांतून लेवा गणबोली चे भाषिक सौंदर्य व साहित्याचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.उत्पल चौधरी यांनी ही लेवा बोलीत स्वरचित एक कविता गायिली.

प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.बी.वघुळदे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.जाधव, विद्यार्थि विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मराठी विभाग प्रमुख डॉ.एम.झेड.सुरवाडे यांनी केले, सूत्र संचालन डॉ.डी.एल.सूर्यवंशी व आभार ग्रंथपाल प्रा.आय.जी.गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमासाठी लेफ्ट.डॉ.राजेंद्र राजपूत, डॉ.एस.एल.बिऱ्हाडे, डॉ.ताराचंद सावसाकडे, श्री.कन्हैय्या चौधरी, विद्यार्थी,विद्यार्थिनी यांचे बहुमोल सहकार्य लाभले

Protected Content