पुलवामा हल्ल्यानंतर ४३ तरुण दहशतवादी संघटनेत

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । पुलवामामध्ये अर्धसैनिक दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यासाठी स्थानिक तरुण आदिल अहमद डार याचा वापर ‘सुसाईड बॉम्बर’ म्हणून करण्यात आला होता. ‘जैश ए मोहम्मद’च्या दहशतवाद्यांनी या हल्ल्याचा व्हिडिओही बनवला होता. त्याचा वापर करुन तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या हल्ल्यानंतर जवळपास ४३ तरुण दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याची माहिती मिळतेय.

२१ वर्षांचा आदिल डार फेब्रवारी २०१८ मध्ये आपल्या गावातून अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांनी त्याच्या शोधासाठी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. तोदेखील बुरहान वानीप्रमाणेच तरुण होता आणि २०१६ मध्ये बुरहान वानी एका चकमकीत ठार झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या आंदोलनात आदिलदेखील सहभागी होत होता.

आत्मघाती हल्ल्याचा मास्टरमाईंड मोहम्मद उमर फारुख याचा पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांच्या मृतदेहांचे व्हिडिओ बनवून जम्मू काश्मीरमध्ये तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्याचा प्लान होता, परंतु, भारतानं ‘जैश’च्या तळांवर बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यांची ही योजना यशस्वी होऊ शकली नाही. फारुख याला अफगाणिस्तानातील हेलमंद प्रांतात प्रशिक्षण मिळाले होते .

, गेल्या १८ महिन्यांत जैश ए मोहम्मदचा काश्मीर भागातील प्रभाव वाढल्याचं दिसून येतंय. या भागातील अनेक तरुण बेपत्ता असल्याचंही समोर आलंय. २०१८ पासून बेपत्ता झालेल्या ८० हून अधिक तरुण जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडे वळलेत. त्यापैंकी ४३ जण पुलवामा हल्ल्यानंतर या संघटनेत सहभागी झाले आहेत .

Protected Content