मुक्ताई मंदिर सुरू करण्यासाठी भाजपचे घंटानाद आंदोलन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली येथील मुक्ताई मंदिर परिसरात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

भाजपच्या आजच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या अनुषंगाने मुक्ताईनगर येतील मुक्ताई मंदिर परिसरात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्र फडके, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, कृउबा समिती सभापती निवृत्ती पाटील, पं. स. सभापती विद्या पाटील, नगराध्यक्ष नजमा तडवी, जि.प. सदस्य वैशाली तायडे, जि.प. सदस्य निलेश पाटील, तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, विनायक पाटील, तालुका सरचिटणीस सुनील काटे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, माजी तालुका सरचिटणीस संदीप देशमुख, भाजयुमो विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ताभाऊ पाटील, माजी पं.स. सभापती राजूभाऊ माळी, निलेश मालवेकर, शिवराज पाटील, प्रशांत महाजन, अजय भारंबे, पराग पाटील, पंकज येवले, मुन्ना बोनडे व इतरांनी या आंदोलन सहभाग घेतला होता.

Protected Content