पेटीएम-बीसीसीआयमध्ये 326.80 कोटींचा करार

paytm bcci logo

 

मुंबई प्रतिनिधी । पेटीएमचे मालकी हक्क असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स प्रा. लिमिटेड कंपनीने बीसीसीआयचे टायटल स्पॉन्सरशीप हक्क स्वतःकडे घेतले असून मैदानावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व स्थानिक क्रिकेटमधील प्रत्येकी सामना 3.80 कोटी रुपये पेटीएम मोजणार आहे.

याबाबत माहिती अशी की, बीसीसीआयने आज दि. 21 ऑगस्ट बुधवार रोजी ही घोषणा केली आहे. 2015मध्ये पेटीएमनेच चार वर्षांसाठी टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते. ”2019-23 या कालावधीपर्यंत भारतात होणाऱ्या सामन्यांच्या टायटल स्पॉन्सरशीपसाठी 326.80 कोटींचे डील झाली आहे. प्रत्येक सामन्याला 3.80 कोटी बोली लावण्यात आली, ही रक्कम आधीच्या (2.4 कोटी) बोलीच्या 58% अधिक आहे” असे बीसीसीआयने यावेळी सांगितले आहे.

Protected Content