ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेकडे केली अडीच कोटीची मागणी; पुण्यातून आरोपी ताब्यात

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ईव्हीएम हॅक करतो अडीच कोटी रूपये दया अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना करण्यात आली. मारूती ढाकणे असे आरोपीचे नाव आहे. त्याला एक लाख रूपये घेताना पकडण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

आरोपी हा मूळचा अहमदनगर जिल्हयातील रहिवासी आहे. तो सैन्यात हवालदार म्हणून आहे. त्याने अंबादास दानवे यांना फोन करून संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन हॅक करून हवा असेल असा निकाल देतो अशी ऑफर देत दानवेंकडून अडीच कोटी रूपयांची मागणी केली होती. याबाबत दानवें यांनी संशय आल्यामुळे पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी कट रचून त्याचा अंबादास दानवे यांच्याकडे पैसे दिले आणि पुण्यातील गोल्डन हॉटेलमध्ये पैसे घेताना रंगेहात पकडयात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांला ताब्यात घेतले. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनामध्ये लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे संदीप भूमरे आणि एआयएमआयएकडून इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

Protected Content