जिल्ह्यातील दोन नेत्यांच्या विधानपरिषद निवडणुकीत महत्वाच्या भूमिका

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | विधानपरिषद निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली असून यात एकनाथराव खडसे यांच्या आगामी वाटचालीचा फैसला होणार असल्याने जळगाव जिल्हावासियांना याबाबत खूप उत्कंठा लागली आहे. यातच या निवडणुकीत जिल्ह्यातील दोन नेत्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावल्याचे दिसून येत आहे.

अवघ्या काही तासांमध्ये विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यात एकनाथराव खडसे यांना विजयश्री मिळणार की नाही ? याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. अर्थात, जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता नाथाभाऊंमुळे ही निवडणूक उत्सुकतेची ठरली आहे. यासोबत जळगाव जिल्ह्यातील दोन नेत्यांनी या निवडणुकीत पडद्याआड मोठी भूमिका पार पाडली आहे. यात भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे भाजपने व्यूहरचनेची मोठी जबाबदारी दिली होती. प्रवीण दरेकर आणि आशीष शेलार यांच्यासोबत आमदार महाजन यांच्याकडे या निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी याबाबत मोर्चेबांधणी केली आहे. आता याला कितपत यश मिळणार हे लवकरच समजणार आहे.

तर, यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून देखील या निवडणुकीच्या नियोजनात मोठी भूमिका पार पाडली आहे. यासोबत त्यांनी आज होत असलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मतदान प्रतिनिधी म्हणून कामगिरी पाहिली. यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत नाथाभाऊंवर प्रसिध्दीचा झोत असला तरी आमदार गिरीश महाजन आणि आमदार अनिल पाटील यांनी देखील पडद्याआठ भूमीका पार पाडली आहे.

Protected Content