काश्मीरमध्ये बॉर्डरवर दहशतवादयांचा हल्ला; हवाई दलाचे ५ जवान जखमी

जम्मू-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सीमारेषेवर सैन्य दलाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. अशातच जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

या हल्ल्यात ५ जवान जखमी झाले असून हे सर्व हवाई दलाचे जवान आहे. त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील शोधमोहिम सुरू आहे.

Protected Content