बारामतीमध्ये रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची केली पूजा; गुन्हा दाखल

बारामती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघामध्ये आज मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. बारामतीमध्येही याच टप्प्यात मतदान होत आहे. अशातच बारामतीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

रूपाली चाकणकर खडकवासला येथील एका मतदान केंद्रावर पोहचल्या असता त्यांनी मतदानापूर्वी औक्षण करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात आल्या. त्यांनी ताटात दिवासुध्दा ठेवलेला होता. त्यांनंतर त्यांनी मतदान केंद्रात असलेल्या ईव्हीएम मशीनची पूजा केली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यानेच त्यांच्याविरोधात तक्रार दिली असता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजंय यांची हायवोल्टेज लढत रंगली आहे.

Protected Content