१ एप्रिलपासून ७ बँकांचे आयएफएससी कोड बदलणार

 

मुंबई : वृत्तसंस्था । देना बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्रा बँक, ओऱिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूनायटेड बँक आणि इलाहाबाद या ७ बँकांपैकी कोणत्याही बँकेमध्ये खातं असणाऱ्या ग्राहकांनी त्यांच्या बँक शाखेशी संपर्क करुन नव्या चेकबुक आणि आयएफएससी कोडसंदर्भात माहिती घेणं फायद्याचं ठरेल.

 

बँकाच्या विलनीकरणानंतर अनेक बँकांचे चेकबुक, पासबुक आणि आयएफएससी कोडमध्ये मोठे बदल होणार आहेत. एक एप्रिलनंतर देशातील सात बँकांच्या ग्राहकांना दैनंदिन बँक व्यवहारांमध्ये या बदलाचा परिणाम जाणवू शकतो. एक एप्रिल २०२१ पासून अनेक बँकांची जुने चेकबुक आणि आयएफएससी कोड निष्क्रीय होणार आहेत. त्यामुळे या सात बँकांमध्ये खाती असणाऱ्या ग्राहकांनी बँकेत फोन करुन आपला नवीन कोड जाणून घेणं फायद्याचं ठरु शकतं. बदलेला कोड ठाऊक असल्यास ऑनलाइन व्यवहार करताना ग्राहकांना काही अडचणी येणार नाहीत.

 

 

अनेक बँकांमध्ये वापरात नसणारी  खाती असल्यास बसू शकतो एक एप्रिलपासून सरकारने देशातील तीन बँकांच्या विलनीकरणाचा निर्णय घेतला आहे.  पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटर बँक ऑफ कॉमर्स आणि यूनायटेड बँक ऑफ इंडियाचे विलनीकरण होणार आहे. विजया बँकेचं विलनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झालं असून हा बदल एक एप्रिलपासून लागू होणार आहे. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत तर आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक यूनियन बँके ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहे. इलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन होणार आहे.

 

आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेमध्ये खातं असणाऱ्या ग्राहकांना बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरुन लॉगइन करण्यासाठी नव्या आयएफएससी कोडचा वापर करु शकतात. ग्राहकांना www.unionbankofindia.co.in या वेबसाईटला भेट द्यावी लागले.  बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकांवर १८००२०८२२४४ अथवा १८००४२५१५१५ अथवा १८००४२५३५५५ वर फोन करुन ग्राहक माहिती घेऊ शकतात. एसएमएसच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचाही पर्याय ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आलाय. यासाठी ग्राहकांना जुना आयएफएससी क्रमांक, ‘IFSC स्पेस 00000 (OLD IFSC) स्पेस’ अशा स्वरुपात ९२२३००८४८६ वर पाठवल्यावर नवीन आयएफएससी क्रमांक कळू शकतो.

 

आयएफएससी कोडमध्ये बदल झाल्यास त्याचा ग्राहकांच्या व्यवहारांवर परिणाम होतो.सर्व शाखांमध्ये जुन्या आयएफएससी कोडवरुन ३१ मार्चपर्यंत व्यवहार सुरु राहणार आहेत. बँकांनिही या नवीन बदलांसंदर्भात ग्राहकांना माहिती देण्यास सुरुवात केलीय. ऑनलाइन व्यवहार करताना खाते क्रमांकाबरोबरच बँकेचा आयएफएससी कोडही आवश्यक असतो. इंडियन फाइनॅनशियल सिस्टीम कोड म्हणजेच आयएफएससी कोड हा प्रत्येक शाखेला देण्यात आलेला विशेष क्रमांक असतो. भारतामध्ये एकाच बँकेच्या अनेक शाखा असल्याने केवळ पत्त्यावरुन त्यांची ओळख पटवणे कठीण होत असल्याने हे क्रमांक देण्यात आले आहेत.

 

म्यूचुअल फंड्स, ट्रेडिंग अकाऊंट, विमा कंपन्या, आयकर विभागाशीसंबंधित खातं, एफडी किंवा आरडी, पीएफ खातं आणि इतर महत्वाच्या ठिकाणी बँकेच्या बदलेल्या आयएफएससीसंदर्भात माहिती ग्राहकांना द्यावी लागेल.

Protected Content