अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या उमेदवार; सातवी यादी आली समोर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभेच्या निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत दोन नावांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून सध्या अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. भाजपसोबत महायुतीत असताना ही प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू नवनीत राणा यांच्याविरोधात प्रचार करणार आहे. त्यासोबतच आनंदराव अडसूळ यांनाही विरोध दर्शविला आहे. ही राजकीय आत्महत्या आहे असे अडसूळ म्हणाले. आनंदराव अडसूळ यांनी अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरणार आहे.

२०१९ च्या निवडणूकीत नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या पाठिब्यांने अपक्ष उमेदवार म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यांनी भाजपच्या विरोधात प्रचार केला होता. पण २०२४ च्या निवडणूकीत आता नवनीत राणा भाजपच्या उमेदवार झाल्या आहेत. याव्यतिरिक्त या यादीत कर्नाटकातील चित्रदूर्ग मतदारसंघातील उमेदवार ही जाहीर करण्यात आला आहे. तेथे भाजपने गोंविद करजोल यांना उमेदवारी दिली आहे.

Protected Content