चंद्रशेखर अत्तरदे यांचा लोणे-भोणे, पिंपळे गावात झंझावाती प्रचार

chandrashekhar attarade

धरणगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण मतदार संघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचार दौऱ्याचा शुभारंभ आज करण्यात आला. त्यांनी तालुक्यातील लोणे-भोण, पिंपळे बु, पिंपळे, खु, महांकाळे व कंडारी गावात झंझावाती प्रचार केला.

गावातील महिलांनी चंद्रशेखर अत्तरदे यांचे औक्षण करून तसेच फुलहार घालून स्वागत केले. व दादांच्या विजयासाठी देवाकडे साकडे घातले. श्री.चंद्रशेखर अत्तरदे यांनी गावातील थोर-मोठ्यांच्या भेटी-गाठी घेतल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले. धरणगाव तालुक्यातील नांदेड-साळवा गटातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी तसेच महांकाळे गावचे सरपंच, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दौऱ्याप्रसंगी जुनिअर मकरंद अनासपुरे, नांदेड-साळवा जि.प. सदस्य माधुरीताई अत्तरदे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील, भाजपा ज्येष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, प्रभाकरआप्पा सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष संजय महाजन, भाजपा शहराध्यक्ष सुनिल वाणी, भाजपा तालुका सरचिटणीस सुनिल चौधरी, धरणगाव येथील नगरसेवक गुलाब मराठे, ललित येवले, कैलास माळी सर्, सचिन पाटील, कांतीलाल माळी, भालचंद्र माळी, शरद आन्ना, राजेंद्र येवले, शिरीष आन्ना, शेखर पाटील, कन्हैय्या रायपूरकर, राकेश नन्नवरे (सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा), निर्दोष पाटील (सरपंच, सोनवद) यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content