जिल्ह्यातील पक्ष संघटनेत मोठे फेरबदल – डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा प्रतिनिधी । जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनेतील सर्व पातळीवरील पदात लवकरच मोठे फेरबदल करण्याचे संकेत जिल्हा प्रभारी तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांना दिल्याची माहिती आहे.

मागे संघटनेतील कामगिरीसंबंधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थित मुंबई येथे बैठक झाली होती. त्या बैठकीत प्रांताध्यक्ष ना. जयंतराव पाटील आणि जिल्हा प्रभारी ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात चर्चा होऊन संघटनेत फेरबदल करण्याचे संकेत दिल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील युवक संघटना ही बरखास्त करण्यात आलेली आहे. सध्या शेखर बोंद्रे हे प्रभारी म्हणून काम पाहत आहे. युवक जिल्हाध्यक्षपदासाठी नुकत्याच युवकांचे प्रदेशाध्यक्ष शेख आणि कार्याध्यक्ष वरपे यांच्या उपस्थितीत बुलडाणा येथील जिल्हा कार्यालयात मुलाखती संपन्न झाल्या. त्यात अध्यक्षपदासाठी अनेक युवक इच्छुक असून त्यात कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका विचारात घेऊन पक्ष संघटनेत फेरबदल करण्याची भुमिका पक्षाने घेतली असल्याचे कळते.

संघटनेत फेरबदल करण्यासंबंधी फादर बॉडीच्या जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांसह, तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, शहराध्यक्ष आणि त्याच पातळीवरील फ्रंटलचे पदाधिकारी, विविध विभाग व सेलचे पदाधिकारी यांची पक्षातील कामगिरी हा महत्वाचा निकष  लावण्यात येणार असल्याची माहिती आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी फेरबदल करण्यासंबंधी कोणती कार्यपद्धती अवलंबवितात याकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Protected Content