१० महिन्यानंतर विठुरायाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजली

 

सोलापूर: वृत्तसंस्था । आज ( २४ जानेवारी) पुत्रदा एकादशी असल्याने विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात १० महिन्यानंतर पहिल्यांदाच मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतेय.

जवळपास दोन लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. पंढरपूरच्या विठोबा मंदिरातील ऑनलाईन पास नोंदणी पद्धत रद्द केल्याचा परिणाम भाविकांची संख्या वाढण्यात झाल्याचं पाहायला मिळतेय.

पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी असल्याने विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून जवळपास दोन लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. मुखदर्शनाची रांग मंदिरापासून दोन किलोमीटर लांब गेली आहे. शनिवार पासूनच पंढरपूरातील भक्त निवास, मठ, धर्मशाळा, लॉज हाऊसफुल्ल झाले आहेत. भाविकांची संख्या वाढत असल्यानं कोरोनामुळे बिघडलेले आर्थिक चक्र आता व्यवस्थित सुरु होईल
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेत भाविकांना प्रवेश करतानाच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सक्तीचा केला आहे. भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. मंदिर प्रशासनाने जास्तीत जास्त भाविकाना दर्शन मिळावे यासाठी ओनलाइन दर्शनाची सक्ती कमी केली आहे.

६५ वर्षांवरील व्यक्ती व १० वर्षा खालील लहान मुलांना मात्र प्रवेश बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

Protected Content