Home क्राईम मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा मोबाईल लांबविला; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा मोबाईल लांबविला; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

0
116

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रोडवरील लांडोर खोर वनउद्यानात शतपावली करत असलेल्या महिलेचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पुनम जीवन येवले (वय-३५) रा. पार्वती नगर, रामानंद नगर ह्या मोहाडी रोडवरील लांडोरखोरी वनउद्यानात दररोजप्रमाणे फिरण्यासाठी २३ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास गेल्या. पायी चालत असतांना त्यांचा मोबाईल खाली पडला. त्याचवेळी एकाने त्यांचा मोबाईल घेवून फरार झाला. आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. रात्री उशीरा एमआयडीसी पोलीसात पूनम येवले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इम्रान सय्यद करीत आहे.


Protected Content

Play sound