…तर हा देश ड्रामा करणाऱ्यांचा ; अर्थमंत्र्यांना आव्हाडांचे सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई (वृत्तसंस्था) जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे करणे ड्रामा बाजी असेल, तर हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे’ असे सणसणीत प्रत्युत्तर गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना दिले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. पॅकेज वाटपाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीतारामन यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी काँग्रेसलाच ड्रामेबाज ठरवून टाकले. ‘खरे ड्रामेबाज काँग्रेसवाले आहेत. राहुल गांधी रस्त्यावर बसून मजुरांशी चर्चा करतात आणि त्यांचा वेळ उगाचच वाया घालवतात. यापेक्षा त्यांनी मजुरांच्या मुलांना घेऊन आणि त्यांचे सामान घेऊन त्यांना मदत करायला हवी होती,’ अशी टीका सीतारामन यांनी केली होती. त्यावर जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे तसेच त्यांच्यासोबत चालणे ही राहुल गांधींची ड्रामाबाजी आहे, असे निर्मला सीतारामन यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामाबाजी आहे, तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे. माणुसकी इथे व्यक्त होते असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

 

Protected Content