हॉटेल मॅनेजमेंटद्वारे रोजगाराच्या विविध संधी : प्रिन्सिपॉल पुनीत बस्सन

जळगाव, प्रतिनिधी | हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असून देशात व परदेशात याचे प्रशिक्षण पंचतारांकित हॉटेलमध्ये दिले जात असल्याची माहिती गोदावरी फाऊंडेशन संचलित हरिभाऊ जावळे इन्स्टिटयूट ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनॅजमेन्ट अ‍ॅण्ड केटरिंग टेकनॉलॉजीचे प्रिन्सिपॉल  पुनीत बस्सन यांनी दिली.

 

अनेकांच्या मनात हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे आचारी किंवा वेटर बनू शकतो असा समज आहे. मात्र हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे आचारी बनणे किंवा वेटर होणे असे नाही. या कोर्समध्ये फ्रंट ऑफिस, कार्यालयाचे नियोजन, स्वच्छता (हाऊस किपींग), अन्न उत्पादन, अन्न पेय सेवा आदिंचे विभाग असतात. त्याअंतर्गत थेअरी, प्रात्याक्षिक आणि प्रशिक्षणाचा समावेश आहे. प्रशिक्षणाचा कालावधी हा पाच महिन्याचा असतो. हे प्रशिक्षण पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतात किंवा विदेशात इतरत्र देखील होत असते. पदवी संपादन करताच लगेचच नोकरीच्या विविध संधी उपलब्ध असतात, आणि लगेचच विद्यार्थ्यार्ंच्या हातात चांगल्या पॅकेजची नोकरी उपलब्ध असल्याची माहिती हरिभाऊ जावळे इन्स्टिटयूट ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनॅजमेन्ट अ‍ॅण्ड केटरिंग टेकनॉलॉजीचे प्रिंसीपल पुनीत बस्सन यांनी दिली.

 

करिअरच्या संधी

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केल्यावर पंच तारांकित (फाइव्ह स्टार) हॉटेल्स किंवा रिसॉर्ट ठिकाणी नोकरीची संधी असते. हॉटेल्स हे शक्यतो मोठ्या शहरात आणि विदेशात असतात, त्यामुळे नोकरीनिमित्त परदेशातही जाण्याची संधी उपलब्ध असते, त्यासाठी व्हिसा सुलभरीत्या मिळतो. यामुळे विद्यार्थ्याला नोकरीनिमित्त पर्यटन करण्याची विशेष संधी उपलब्ध होते. तिथे जहाजावरही क्रूझ लायनर म्हणून किंवा रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये नोकरीच्या संधी असतात. विशेष म्हणजे क्रूझ लायनरवर चांगले आकर्षक वेतन मिळते. पर्यटन वाढल्यामुळे विदेशात हॉटेल मॅनेजमेंटच्या नोकर्याही असतात आणि त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळतो आणि तोही करमुक्त असतो. तिथल्या कंपन्या त्यांना खाण्याची आणि राहण्याची सुविधा देतात. काही वर्ष काम केल्यानंतर तुम्ही तिथे पर्मनंट रेसिडेंट साठी अर्ज करुन तिथले नागरिक होऊ शकतात. याशिवाय हॉटेल मॅनेजमेंटचे येथील प्रशिक्षण संपवून दुबई, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, आणि ऑस्ट्रेलिया या देशांत त्यांना जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध  असतात.

खान्देशातही हॉटेल मॅनेजमेंट कोर्स उपलब्ध

आता हॉटेल मॅनॅजमेन्ट करण्याची संधी आपल्या खान्देशातही उपलब्ध झाली आहे. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी खान्देशवासियांच्या सेवेत हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज सुरु केलेले आहे. कॉलेज चे नाव माजी खासदार स्व.हरिभाऊ जावळे यांच्या नावावरून ठेवलेले आहे. गोदावरी फाऊंडेशन संचलित हरिभाऊ जावळे इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नोलाजी आपल्या जळगाव मध्ये गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कॅम्पस , प- ५१, पत्ता – एम.आय. डी.सी. भुसावळ रोड इथे आहे. आपले कॉलेज अखिल भारतीय तांत्रिकी शिक्षण परिषद ( ए.आय.सी.टी .ई. ) येथे मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे खान्देशातील विद्यार्थ्यांना आता मुंबई पुण्याला जावे लागणार नसून येथूनच ते हॉटेल मॅनेजमेंट विषयात पदवी संपादन करु शकतात.

 

पात्रता

हॉटेल मॅनेजमेंट या कोर्ससाठी प्रवेश करतांना उमेदवाराने शासनाची बी.एच.एम.सी.टी-सीईटी देणे अनिवार्य असून अगदी एक गुण जरी मिळाला तरी तो प्रवेशासाठी पात्र ठरतो. त्याआधी कुठल्याही विद्याशाखेतून उमेदवार हा १२ वी उत्तीर्ण असावा. सीईटी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी बी.एच.एम.सी.टी साठी अर्ज करण्यास पात्र ठरतो. गोदावरी फाऊंडेशन संचलित हरिभाऊ जावळे इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी येथे चार वर्षाचा बॅचलर इन हॉटेल मॅनॅजमेन्ट अँड केटरिंग टेकनॉलॉजी (बी.एच.एम.सी.टी ) चा पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी, लोणेरे येथून या अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे. २०२१-२०२२ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेस लवकरच सुरुवात होणार असून नावनोंदणी सुरु असल्याचे प्रिन्सिपॉल  पुनीत बस्सन

Protected Content