Home Cities पाचोरा निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची आय.आय.टी. साठी निवड

निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची आय.आय.टी. साठी निवड

0
32

पाचोरा प्रतिनिधी । नुकतीच घेण्यात आलेल्या जे.ई.ई. ॲडव्हान्स परिक्षेत पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल मधील दोन विद्यार्थ्यांची आय.आय.टी साठी निवड करण्यात आली आहे.

सायली बोरसे व यश कोतकर असे या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. यश याने संपूर्ण भारतातून १,०४० वा क्रमांक तर सायली हिने ६,०६६ वा कमांक मिळवून देदीप्यमान असे यश संपादन केले आहे. या उत्तुंग यशावाद्दल संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय डॉ. भगवान सावंत, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे आणि प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांनी तसेच त्यांना मार्गदर्शन करणा-या सर्वच शिक्षकांनी दोघांचे अभिनंदन केले आहे. यश व  सायली यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

 


Protected Content

Play sound