हेलमेट निर्मात्यांना बीआयएस सर्टिफिकेशन बंधनकारक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । केंद्रातील मोदी सरकारने रस्ते अपघाताला आळा बसावा यासाठी बीआयएस सर्टिफिकेशनच्या हेलमेटची विक्री आणि बनवणे बंधनकारक केले आहे.

रस्ते वाहन आणि राज मार्ग मंत्रालयाने हेलमेट फॉर राइडर्स ऑफ टू व्हीलर्स मोटर व्हीकल (क्वॉलिटी कंट्रोल) अंतर्गत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यानुसार, केवळ बीआयएस सर्टिफिकेशनच्या हेलमेटची यापुढे विक्री करता येणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, देशात हलक्या हेलमेटसाठी एक रोड सेफ्टी वर एक समिती बनवण्यात आली होती. समितीत एम्स डॉक्टर आणि बीआयएसच्या अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील जाणकारांचा समावेश होता. मार्च २०१८ मध्ये बनवण्यात आलेल्या या समितीत वजनाने हलक्या आणि गुणवत्तापूर्ण हेलमेट बनवण्याची शिफारस करण्यात आली होती. आता या शिफारशीला रस्ते वाहन आणि राजमार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तसेच मंत्रालयाने ताजे आदेश जारी केले आहेत.

सुप्रीम कोर्टाने सुद्धा हेच सांगितले होते की, दुचाकी वाहन चालकांना हेलमेट घालणे जरुरी आहे. समितीच्या शिफारसीच्या आधारावर बीआयएस ने हलके आणि गुणवत्ता पूर्ण हेलमेट संबंधी संशोधन केले आहे. आकड्यानुसार, देशात वर्षाला १.७ कोटी दुचाकीचे उत्पादन होत असते. सरकारच्या या नवीन आदेशानुसार, आता केवळ बीआयएस प्रमाणित हेलमेटची विक्री करता येणार आहे. सरकारकडून सांगण्यात आले आहे की, यामुळे देशात कमी गुणवत्तेचे टूव्हीलर हेलमेटच्या विक्रीवर परिणाम होऊन ती कमी होईल तसेच दुचाकीचे होणाऱ्या दुर्घटना कमी होतील.

Protected Content