नवी दिल्ली । दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या माजी नगरसेविका इशरत जहां यांना हिंसा भडकवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
मागील ५० दिवसांपासून इशरत दिल्लीतील खुरेजी परिसरात नागरिकता संशोधन कायद्याविरोधातील आंदोलनात सहभागी होत्या. सीएएविरुद्ध उत्तर पूर्व दिल्लीत अनेक ठिकाणी हिंसा भडकल्यानंतरही शनिवारी शांततापूर्व वातावरण होते. ज्या ठिकाणी अधिक हिंसा झाली, तिथे अजुनही लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. दरम्यान, या हिंसाचाराला चिथावणी देण्याच्या आरोपाखाली आज इशरत जहा यांना अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीत कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या हिंसेत आतापर्यंत ४२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत १२३ एफआयआर दाखल केल्या आहेत. तर ६३० आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.