राहुल गांधींच्या सभेत सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राहणार स्वतंत्र मंच

शेगाव -अमोल सराफ | काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे जिल्ह्यात लवकरच आगमन होणार आहे. महाराष्ट्रात यात्रेचे आगमन झाल्यानंतर नांदेड येथे पहिली जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता दुसरी जाहीर सभेच्या शेगावचे येथे २२ एकर शेतामध्ये होणार असून त्या दृष्टीने जयत तयारी सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे.

 

विदर्भाचे पंढरी समजला जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज यांच्या शेगावात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे आगमन शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे शेगावची सभा ही काँग्रेसच्या दृष्टीने एक महत्त्वाची  ठरणार आहे. नांदेड येथे सभा झाली त्याच्या तीन पट मोठी जागा ही शेगावमध्ये आहे. गेल्या पाच दिवसांनी सभास्थळचे सपाटीकरण, मंचाची उभारणी अशी कामे करण्यात येत आहे. सभेच्या स्टेजवर तब्बल सहाशे जणांचा राबता राहणार आहे.   विशेष म्हणजे सुरक्षा दृष्टीने या सभेच्या बैठक व्यवस्थेसह महत्त्वांच्या बाबीकडे पाहिले जात आहे. राहुल गांधींनी दक्षिणेतून सुरू केलेली त्यांच्या सुमारे ३५०० किलोमीटर यात्रेचा नीमा टप्पा मध्ये यात्रा आली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये .त्यांच्या यात्रेला जवळपास ४८ टक्के टप्पा पूर्ण झाला असून त्या टप्प्यावर शेगावत होणारी सभा ऐतिहासिक म्हणावी लागेल.  सभास्थळी एकूण तीन स्टेज राहणार असून मधले स्टेज हे राहुल गांधी व अन्य पक्षाच्या येणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांसाठी राहणार आहे.  या स्टेजच्या उजव्या बाजूकडे स्टेजवर महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते त्याचा सोबत राहतील. डावीकडून स्टेजवर राहुल गांधी यांच्या समवेत पदयात्रा सहभागी झालेले जवळपास दोनशे पदयात्री स्थानापन्न होतील सभेच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी चार प्रवेशद्वार राहणार आहेत.

 

Protected Content