केकत निंभोरा ते शेगाव दिंडीचे खामगावात स्वागत

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथून शेगावला जाणार्‍या पायी दिंडीचे खामगावात अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले.

मागील तेरा वर्षांपासून श्री शेत्र विठ्ठल रुक्माई मंदिर जामनेर केकत निंभोरा ते शेगाव पायी दिंडी सोहळा ६० ते ७० वारकर्‍यांच्या माध्यमातून आयोजित केला जातो. सदर दिंडी ही नित्य क्रमाने मागील तेरा वर्षापासून हा उपक्रम राबवत असते .या अंतर्गत यावर्षी या पायी दिंडीचा उपक्रम पार पडला.

यानिमित्ताने मुक्कामाच्या खामगाव मध्ये श्री रवींद्र रामदास कुलकर्णी व त्यांच्या परिवार सदस्यांच्या वतीने नित्य नियमाप्रमाणे पालखीचे स्वागत व वारकर्‍यांना प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या पालखीमध्ये सहभागी शेगाव श्री गजानन महाराज संत नगरी येथे मागील तेरा वर्षापासून पायदळ वारी करत असलेले भक्तगण मध्ये केकत निंभोरा येथील सरपंच अमोल प्रताप पाटील ,संभाजी दौलत शिंदे निलेश एकनाथ भुरे, किशोर माऊली शिंदे ,नाना रामधन पाटील, ज्ञानेश्वर म्हस्के, अमोल चिकटे, सुभाष शिंदे यांच्यासह केकत निंभोरा येथील गजानन भक्त मंडळ सदस्य मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

दररोज जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर कापत पाच दिवसांमध्ये श्रीभक्त शेगावात दाखल होतात. पालखीनिमित्त रवींद्र कुलकर्णी यांच्या निवासस्थानी पालखीचे स्वागत करण्यात आले. श्रींच्या पालखीची आरती आणि त्यानंतर दुपारच्या विश्रामानंतर पुढील प्रवासाकरता पालखी शेगाव करता पालखी रवाना झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content