सीएए, एनआरसी : माझ्याकडेही जन्माचा दाखला नाही : छगन भूजबळ

मुंबई (वृत्तसंस्था) मला जर विचारले की तुमच्या आई-वडीलांचा जन्म दाखला दाखवा, तर ते मी देऊ शकत नाही. तसेच माझ्याकडे सुद्धा खरा जन्म दाखला नसून, घरच्यांनी जबरदस्तीने शाळेत टाकले आणि तेव्हा शाळेच्या शिक्षकांनी माझी जन्म तारीख स्वता:चा मनानी टाकून दिली. त्याच्यापलीकडे काहीच नसल्याचे म्हणत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे.

 

भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सीएए बाबत बोलले असतील, पण त्यांनी एनआरसीला पाठींबा दिला नाही. तसेच राज्यात एनआरसी लागू होऊ देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आमच्या पक्षाचे मात्र या तिन्ही गोष्टीला विरोध आहे. अधिवासी भागातील नागरिकांकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. तर अनेक समाजातील लोकं भटकंती करत असतात. त्यांचे राहण्याचे कोणतेही एक ठिकाण नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कागदपत्रे कुठून येणार. तर हिंदूंना या कायद्यामुळे सर्वात जास्त त्रास होणार असल्याचे सुद्धा भुजबळ म्हणाले.

Protected Content