एमपीएससी परिक्षेचा निर्णय तातडीने मार्गी लावावा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमपीएसी मुख्य परिक्षा २०२० ही न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. महाधिवक्ता यांच्यामार्फत हस्तक्षेप करून परिक्षेबाबत तात्काळ निर्णय देण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन एमपीएसीच्या मुख्य परिक्षेस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी २३ मे रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एमपीएससी बोर्डाची  मुख्य परिक्षा २०२० मधील भरती प्रक्रिया ही न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहे. ही भरती प्रक्रिया अडकल्याने महाधिवक्ता यांच्या मार्फत हस्तक्षेप करून भरती प्रक्रिया तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच उर्वरित भरीत प्रक्रिया तातडीने पुर्ण करावी. तब्बल अडीच वर्षे उलटून गेली असून संबंधित भरतीप्रक्रिया पुर्ण झालेली नाही. या कारणामुहे २२ व २९ जानेवारी २०२२ रोजी नियोजित असलेली मुख्य परिक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहे. उच्च न्यायालयात १७ फेब्रुवारी रोजी पीटीशन दाखल करण्यात आली आहे. चार महिने उलटून देखील आजवर एकही सुनावणी झालेली नाही. यामुळे सर्व उमेदवार प्रचंड मानसिक व आर्थीक तणावने त्रस्त झालेली आहेत. तरी महाधिवक्ता यांनी उच्च न्यायालयाच्या १३ हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निदर्शनास आणून द्यावा व मुख्य परिक्षेची तारीख जाहीर करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन एमपीएसीच्या मुख्य परिक्षेस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे.

या निवेदनावर नरेंद्र पाटील, श्याम कोळी, मुकेश पाटील, स्वप्निल पाटील, अजय गवळी, अविनाश वाघ, अमेाल पाटील, निलेश दळवी, दिपक युयुंद्रे, सुधीर तावडे, श्रीकांत तन्नीरवार, चित्रगुप्त सुर्यवंशी, वाल्मिक अवधान, रविराज झरेकर, सुनील सुरळकर, स्वप्निल खडसे, भाविका पिंगे, दिपाली सुर्यवंशी, प्रांजली पाटील, कल्याणी नजन, मनिषा पवार यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content