हरीभाऊ एक आदर्श राजकारणी- महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । माजी खासदार व आमदार हरीभाऊ जावळे हे एक आदर्श राजकारणी असून त्यांच्या निधनाने एक चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याची आदरांजली महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी व्यक्त केली आहे.

हरीभाऊ जावळे यांच्या निधनाने यावल व रावेर तालुक्यातील जनतेला जबर धक्का बसला असून अनेकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. यात सत्पंथी देवस्थानाचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी ओथंबलेल्या शब्दांमध्ये त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की,

भाऊंना श्रद्धांजली असे लिहिताना हातांना कंप येतो आहे. कारण असे चारित्र्य संपन्न संवेदनशील नेतृत्त्व क्वचितच बघायला मिळते. आपला माणूस हक्काचा माणूस म्हणजे हरिभाऊ. भाऊंचे कार्य कर्तुत्व त्यांच्या विनम्र स्वभावाने प्रभावशाली भासायचे. त्यांचा मन-मिळावू स्वभाव, साधेपणा, पक्षनिष्ठा, धर्मनिष्ठा सर्व धर्म पंथ संप्रदाय व संतांच्या बद्दल आदर, सर्व गरीब, श्रीमंतांना सम दृष्टीने न्याय मिळवून देणे, मान सन्मानाची अपेक्षा न करता सातत्याने जन-कल्याणासाही झटत राहणे कायम स्मरणात राहील. जनसेवा हीच प्रभुसेवा हा जीवनाचा मंत्र बनविला व भाऊनी अखेरच्या श्‍वासापर्यंत कर्मयोग सिध्द केला. अशा हा महनीय व्यक्तीमत्वास आदरांजली.

Protected Content