हमीभावाने हरभरा खरेदीला प्रारंभ

 

रावेर  : प्रतिनिधी । तालुक्यात नाफेड ( महाएफपीसी )मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत हमी भावाने   हरभरा  खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे  

 

सन २०२०/२०२१ वर्षाच्या  हंगामात , उपअभिकर्ता संस्था म्हणून तालुक्यातील श्रमसाधना फार्मर्स  पोडुसर कंपनी मार्फत हरभरा खरेदीचा शुभारंभ आज ( २५ मार्च ) चोरवड येथे रावेरच्या   तहसीलदार उषाराणी देवगुणे  यांच्या प्रमुख उपस्थितीत सावदाचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आला काटापूजन व धान्य पूजन वानखेडे यांनी केल्यानंतर  प्रथम शेतकरी रविंद्र पाटील (मोरगाव )  यांचा सत्कार करण्यात आला

 

श्रमसाधना फार्मर्स   प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन रमेश नगराज पाटील, दिपक पाटील ( पं.स सदस्य रावेर) , शेख हमीद, संतोष पाटील, जी व्ही पाटील, राहुल महाजन, सचिन पाटील, किरण पाटील, ज्ञानेश्वर पाटील यावेळी  उपस्थित होते

Protected Content