एप्रिल-मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट जोरात ; दक्षतेचा इशारा

 

 

 मुंबई : वृत्तसंस्था । देशात फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च टीमने तयार केलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. दुसरी लाट जवळपास 100 दिवस भारतात राहील. मे पर्यंत या लाटेचा परिणाम पाहायला मिळू शकतो  .

 

या अहवालानुसार एप्रिल- मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट जोरदार असणार आहे. 23 मार्चच्या कोरोना ट्रेन्डचा विचार करायचा झाला तर, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 25 लाखापेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त होऊ शकतात. स्थानिक  स्तरावर लॉकडाऊनसारख्या निर्बंधांचा कुठलाही परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे लसीकरणावर भर आणि त्याचा वेग वाढवणं गरजेचं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

 

 

काही राज्यात कडक लॉकडाऊनच्या निर्णयाचे परिणाम पुढील महिन्यात दिसून येतील, . तसंच या  अहवालात राज्यांनी लसीकरणावर भर देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.

 

सध्या रोज 34 लाख लोकांना लस दिली जात आहे. हा वेग 45 लाखांवर घेऊन गेल्यास पुढील 3 ते 4 महिन्यात 45 वर्षांवरील सर्वांना लस टोचली जाऊ शकते. कोरोनाची दुसरी लाट वेळेपूर्वी  आली आहे . त्यामुळे अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. टेस्टची संख्या वाढवणे, मास्क वापरणे, सोबतच लसीकरण मोहीम लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.

 

पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसह अधिक वृद्धांची संख्या असलेल्या राज्यांनी  लोकसंख्येच्या कमी प्रमाणात लसीकरण केलं आहे. लसीकरणाची गती वाढवणं गरजेचं असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.

Protected Content