आता पुढचा नंबर ठाकरे कुटुंबाचाच ! : निलेश राणे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संजय राऊत यांच्यावरील ईडीची कारवाई योग्य असून आता पुढचा क्रमांक ठाकरे कुटुंबाचा असू शकतो असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

राणे पिता-पुत्र हे गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल करत आहेत. आता संजय राऊत हे अडचणीत आल्यानंतर राणे पुन्हा आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे त्यांच्या परिवाराला धीर देण्यासाठी भांडूप येथील घरी गेले होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आईची भेट घेतली. तसेच त्यांच्या कुटुंबियांनादेखील धीर देण्याचा प्रयत्न केला. संकटाच्या काळात मी तुमच्या सोबत आहे, असा शब्द त्यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांना दिला. यावरून आता त्यांनी टीका केली आहे. ठाकरे हे आधी अडचणीत आलेल्या नेत्यांच्या घरी गेले नव्हते असे ते म्हणाले.

या संदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, दुसर्‍यांच्या घरात पण आई असते. मागच्या अडीच वर्षात दुसर्‍यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत यांनी विसरता कामा नये, असा टोला निलेश राणेंनी लगावला. याच ट्विटमध्ये पुढे निलेश राणेंनी, हेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला पण लागू होतं, कारण पुढचा नंबर त्यांचा असू शकतो, असा इशारा निलेश राणे यांनी या ट्विटमध्ये दिला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.