श्री संत गजानन महाराज पालखी खामगावात आगमनाने

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी अश्‍व, गज व “गजानना अवलिया अवतरले जग ताराया” च्या जयघोषात पालखीचे आज खामगावात आगमन झाले आहे.

श्रींच्या भक्तांकडून पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे, हनुमान व्हिटॅमिन येथील पहिल्या मुक्कामानंतर सकाळी 11 वाजता महाराजांच्या पालखीच्या नगर परिक्रमेला सुरुवात झाली. शहरात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

खामगाव शहरातील वाल्मीक चौक, विकमसी चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती, टिळक पुतळा,अर्जुन जलमंदिर, मुख्य रस्ता, जगदंबा चौक, महावीर चौक, मोहन चौक, फरशी, महावीर भवन, एचडीएफसी बँक, खामगाव अर्बन बँकेसमोरून श्री।अ। खि। नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात दुपारी ३ वाजतापासून पालखी मुक्कामी थांबेल. तर बुधवारी पहाटे अग्रसने चौक, कमान गेट, शहर पोलीस स्टेशन, आयकर भवन, बस स्थानक चौक मार्गे सामान्य रुग्णालयासमोरून शेगावसाठी मार्गस्थ होईल.

उद्या बुधवारी पहाटे श्री संत गजानन महाराज यांची पालखी खामगाव वरून शेगावकडे प्रस्थान होईल। यावेळी भाविक मोठ्या संख्येने शेगाव पायी वारी करणार आहेत. पालखीचे व भाविकांचे ठिकठिकाणी स्वागत होणार असून त्यांच्यासाठी चहा, नाश्ता, महाप्रसाद वितरणाची व्यवस्था विविध सेवाभावी संघटनांनी केली आहे. यामुळे उद्या खामगाव – शेगाव हा राज्यमहामार्ग सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस।राममूर्ती यांनी काढलेला आहे, अशी माहिती हेगाव हे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी दिली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.