साकळी येथे डॉ. धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्षारोपण

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी येथील हिन्दु स्मशानभुमीत व यावल शहरातील प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ विविध रोपांचे रोपण करण्यात आले.

च्या निमित्ताने विविध जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विविध आपत्तींना आपण सर्वांना सामोरे जावे लागत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यात यावा या दृष्टीकोणातुन ठिकाणी वेगवेगळया वृक्षांची लागवड करण्यात आली.
डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल येथील तहसील कार्यालयाच्या आवारात तसेच यावल पंचायत समितीच्या परिसरात व तालुक्यातील साकळी आणी चोपडा तालुक्यात येथील तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे साकळी गावातील हिन्दु स्मशानभूमीच्या परिसरात १२ सदस्यांच्या उपस्थित विविध वृक्षांच्या एकूण ५० वृक्ष तर चोपडा तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षांची लागवड करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला या प्रसंगी श्री सदस्य व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.