हनुमान नगरात मोफत नेत्र तपासणी शिबीर

जळगाव प्रतिनिधी । वाघ नगर परिसरातील हनुमान नगर येथे अशफाक फाऊंडेशनच्यावतीने आज रविवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेच्या मोफत डोळे तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीराला आमदार राजूमामा भोळे, इंडियन रेडक्रॉसा सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन यांची उपस्थिती होती.

हनुमान नगरातील हनुमान मंदीर परिसरात आज रविवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अशफाक फाऊंडेशच्यावतीने मोफत नेत्रतपासणी शिबीर व चष्मे वाटप शिबीर घेण्यात आले.  यात वाघ नगर परिसरातील ३०० नागरीकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तर २० जणांनी मोफत चष्मे देण्यात आले. यातील ३० जणांना माफक दरात ऑपरेशन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबीराचे उद्घाटन अशफाक फाऊंडेशनचे अध्यक्ष अशफाक शेख यांच्याहस्ते सकाळी ९ वाजता करण्यात आले. या शिबीराला आमदार राजूमामा भोळे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी भेट दिली. याच कार्यक्रमात रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने गरजूंना संसारोपयोगी वस्तूही देण्यात आले. यावेळी रेडक्रॉ सोसायटीच्या वर्मा मॅडम, श्री बियाणी, राधेबाबा, शाहीद शेख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सह्याद्री गृपचे अध्यक्ष संतोष बाविस्कर, जय हनुमार नगरातील भुषण ब्राम्हणकर, गोपाल शर्मा, लोटन पवार, प्रकाश पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content